CM Devendra Fadnavis News AI Image
Video

Nagpur : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Nagpur Devendra Fadnavis News : नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! फळबागा असलेल्या शेतांमध्ये १५ डिसेंबरपर्यंत बोअरवेल खोदकामावरील बंदी उठवणार.

Alisha Khedekar

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतातील बोअरवेल खोदकामावरील बंदी १५ डिसेंबरपर्यंत उठवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यात भूजल पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ४ नोव्हेंबर रोजी बोअरवेल खोदकामावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नवीन बोअरवेल खोदता येत नव्हती. मात्र, सध्या पावसाअभावी अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विशेषतः फळबागा असलेल्या शेतकऱ्यांसमोर पिकांना पाणी कसे द्यायचे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याअभावी फळबागांचे नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा केली. १५ डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवेल खोदकामावरील बंदी उठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ही सवलत फळबागा असलेल्या ठिकाणीच लागू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे फळबागा वाचवण्यासाठी पाण्याची गरज असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या निर्णयाकडे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Health Tests : प्रत्येक महिलेने वर्षातून एकदा आवर्जून कराव्यात 'या' ६ मेडिकल टेस्ट, आजारांचा धोका वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: खेड तालुक्यातील खुरपुडी खुर्दच्या शेतशिवारात बिबट्या दिसला

Instant Chakli Recipe : दिवाळीसाठी इन्स्टंट चकली रेसिपी, भाजणीशिवायही होईल तितकीच कुरकुरीत

Lakshmi Puja Tips: लक्ष्मी पूजनाला नकळतही आणू नका 'या' वस्तू; यामुळे होऊ शकतो लक्ष्मी मातेचा अपमान, वेळीच चुकं सुधारा

Gold Rate : लक्ष्मीपूजेनिमित्त सुवर्ण बाजारात ग्राहकांची गर्दी, १ तोळा सोन्याचा इतका आहे दर; वाचा

SCROLL FOR NEXT