mran Khan Challenges Mumbai Police Notice Asking Him to Leave India saam tv
Video

बॉलीवूड अभिनेत्याला देश सोडून जायला सांगितलं; त्याने हायकोर्टात धाव घेतली|VIDEO

Imran Khan Challenges Mumbai Police Notice: अभिनेता इम्रान खान याला मुंबई पोलिसांनी भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिशीविरोधात इम्रान खानने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.

Omkar Sonawane

साक्षी यादव, साम टीव्ही

अभिनेता इम्रान खान याला भारत सोडण्याची नोटीस बाजवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी बजावलेल्या या नोटीसीविरोधात इम्रान खान याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्याच्या वतीने रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

गेल्या शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या आंदोलनात इम्रान खान सहभागी झाला होता. या आंदोलनात सहभागी झाल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच Foreigners and Immigration कायद्यातील अटी आणि शर्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी त्याला भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे.

इम्रान खान हा अमेरिकेचा नागरिक असून, त्याच्याकडे OCI (Overseas Citizen of India) कार्ड आहे. मुंबई पोलिसांनी त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश दिले आहेत. या नोटिशीला आव्हान देण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आता या प्रकरणात न्यायालय काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोपीचंद पडळकरांना,डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांचा पडळकरांना मिश्किल टोला

Car Neutral or First Gear: ट्रॅफिक सिग्नलवर कार न्यूट्रलमध्ये ठेवावी की गिअरमध्ये?

रेल्वे ट्रॅकजवळच्या झोपड्या हटवणार; 3500 लोकांना घरे रिकामी करण्याची नोटीस, कुठे होणार कारवाई? VIDEO

ट्रेनमध्ये प्रवासात मोठ्या आवाजात गाणी ऐकल्यास वसूल करणार दंड, काय आहे नियम?

Home Decor Tips : बेडरुम असो किंवा हॉल घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोणत्या पडद्यांची निवड कराल?

SCROLL FOR NEXT