Election 2025 Saam Tv
Video

Local Bodies Election: मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या तयारीत, महत्त्वाची माहिती समोर

BMC Local Bodies Election: बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे समोर आले आहे.

Siddhi Hande

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसात लागणार आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, यात बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे बोलले जात आहे. यासाठी काँग्रेसने तयारीदेखील सुरु केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वबळावर तयारी सुरू केलीय. मुंबई काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत शंभरहून अधिक अर्ज वितरित झाले आहेत. महाविकास आघाडी एकत्र येऊन लढणार का?, याबाबत संभ्रम कायम असताना काँग्रेसने उमेदवार चाचपणी सुरू करून स्वतंत्र रणनीती आखल्याचे स्पष्ट झालंय. काँग्रेसकडून संभाव्य उमेदवारांची सामाजिक आणि संघटनात्मक ताकद तपासली जात आहे. या हालचालींमुळे काँग्रेस मविआतून वेगळी भूमिका घेणार का?, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

jio 365 days Plan: वर्षभर रिचार्जची गरज नाही! Jioचा 365 दिवसांचा धमाकेदार प्लॅन; 2.5GB डेटा, किमंत फक्त...

Maharashtra Live News Update : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया

Pune : पुण्यातील सरकारी हॉस्टेलमध्ये दूषित पाणी, २० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

Diabetes Symptoms: पायांमध्ये होणारे हे बदल देतात मधुमेहाचे संकेत; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Gold Rate Today: चांदी ५ हजारांनी घसरली, तर सोन्याचे दरही झाले स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

SCROLL FOR NEXT