BMC 2025: Mumbai civic elections to be held with 227 wards after Supreme Court nod; old structure reinstated by Mahayuti government. Saam tv
Video

BMC Election : बीएमसी प्रभाग रचनेबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Mumbai BMC Election News : मुंबई महापालिका निवडणुका जुन्या २२७ प्रभाग रचनेनुसारच होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या २३६ प्रभागांची याचिका फेटाळली असून, महायुती सरकारचा निर्णय कायम राहणार आहे. अन्य महापालिकांसाठी नवी प्रभाग रचना होणार असली, तरी मुंबईत पूर्वीप्रमाणेच एकसदस्यीय प्रभागांवर आधारित निवडणूक पार पडणार आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

BMC 2025 election full ward structure explained : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबई वगळता राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि नगर पंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेत २२७ एकसदस्यीय प्रभागांनुसार निवडणुका होणार आहेत.

मुंबईत पूर्वी २२७ प्रभाग होते. महाविकास आघाडी सरकारने ही संख्या वाढवून २३६ केली होती. मात्र, महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा २२७ प्रभागांचा निर्णय घेण्यात आला. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका फेटाळण्यात आल्याने मुंबईत जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील.

अ ब आणि क वर्ग महापालिका प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे आणि नागपूर या शहरांचा अ वर्गात समावेश करण्यात आला आहे. ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या शहरांचा ब वर्गात तर नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली या शहरांचा क वर्गात समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Almond Jaggery Puran Poli Recipe : वाटीभर बदाम अन्...; गणपतीसाठी बनवा मऊ- लुसलुशीत पुरणपोळी

SCROLL FOR NEXT