Uddhav- Raj Thackeray Saam Tv
Video

Uddhav- Raj Thackeray: ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत, ८ जानेवारीला होणार प्रदर्शित; पहिला PHOTO समोर

BMC Election 2026: मुंबई महानगर पालिका निवडणुकीदरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त मुलाखत दिली आहे. ही मुलाखत येत्या ८ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या मुलाखतीतील फोटो समोर आला आहे.

Priya More

मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त ठाकरे बंधुंनी संयुक्त मुलाखत दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. ठारकरे बंधूंची ही मुलाखत ८ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या मुलाखतीमधील पहिला फोटो समोर आला असून तो व्हायरल होत आहे. यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महेश मांजकरेकर एकत्र बसलेले दिसत आहेत. या मुलाखतीमध्ये ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ठाकरे बंधू मुंबई महानगर पालिकेचे निवडणूक एकत्र लढत आहेत. नुकताच मनसे-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून वचननामा जाहीर करण्यात आला होता. या वचननाम्यामध्ये मुंबईकरांसाठी शिक्षण, रस्ते, पाणी, वीज, प्रवास हे पूर्ण करण्याबाबत अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी सभांवर जोर न देता प्रत्येक शाखांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि पक्षाचे नेते मुंबईतील शाखांना भेट देत जनतेशी संवाद साधत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापुरात भूसंपादनाचा मोबदला लाटल्याचा धक्कादायक प्रकार

Raksha Bandhan 2026 : 27 की 28 ऑगस्ट रक्षाबंधन कधी? जाणून घ्या योग्य तारीख आणि मुहूर्त

Property Rights: एखाद्या विधवेने मूल दत्तक घेतले, तर मुलाला पतीच्या मालमत्तेत हिस्सा मिळेल का? कायदा काय सांगतो?

Maharashtra SIR Update : महाराष्ट्रातील २ कोटी मतदार वगळणार?

Mumbai : मुंबईत धावत्या लोकलवर दगडफेक; तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT