Akola Municipal Corporation  Saam TV
Video

अकोला महापालिकेत ट्विस्ट, भाजप आणि मविआनंही केला सत्तास्थापनेचा दावा, VIDEO

akola municipal corporation mayor election sharda khedkar : अकोला महापालिकेत सत्तास्थापनेचा पेच आणखी वाढला आहे. भाजपने शहर सुधार आघाडीच्या माध्यमातून दावा केला असून, दुसरीकडे महाविकास आघाडीनेही दावा केला आहे.

Nandkumar Joshi

अकोला महापालिकेत भाजपने शहर सुधार आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजपच्या शारदा खेडकर यांना महापौरपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि शिंदेसेनेचा पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती विभागीय कार्यालयात अपक्ष आणि पक्षीय उमेदवारांचे गट तयार करण्यात आले आहेत. दुसरीकडं महाविकास आघाडीनेही सत्तास्थापनेचा दावा केला आहे. अकोला महापालिकेतील सत्ता समीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

अकोला महापालिकेच्या ८० जागांसाठी निवडणूक झाली. त्यात भाजप सर्वाधिक ३८ जागा जिंकून मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसचे २१ उमेदवार निवडून आले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सहा, शिंदेसेनेचा एक, अजित पवार राष्ट्रवादीचा एक, तर शरद पवार गटाचे तीन उमेदवार विजयी झाले. वंचित बहुजन आघाडीचे पाच, एमआयएमचे तीन, अकोला विकास समिती १ आणि अपक्ष एक उमेदवार विजयी झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Slim Fit Saree Draping Tips: साडीमध्ये स्लिम फिट दिसण्यासाठी फॉलो करा या 5 सोप्या ट्रिक्स

Printed Blouse Design: डेली वेअरसाठी ५ प्रिटेंड ब्लाउज, कोणत्याही साडीवर होतील मॅच

Maharashtra Live News Update: बीडमध्ये सरपंचाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकावर हल्ला

Ladki Bahin Update: बंद झालेला ₹१५०० चा हप्ता पुन्हा सुरू होणार? e-KYC वर मंत्र्याची मोठी घोषणा, जाणून घ्या नवी अपडेट

Crime: अल्पवयीन मुलीचं अपहरण, खोलीत डांबून ठेवलं; मारहाण करत सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT