Maharashtra Politics SaamTv
Video

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Rashtrawadi Congress Sharad Pawar Group : शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सध्या सुरू आहे. अशातच आणखीन एक आमदार भाजपची साथ सोडून तुतारी हाती घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Saam Tv

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजित सिंग मोहिते पाटील हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. वाय. बी. चव्हाण सेंटर इथे ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. मात्र प्रसार माध्यमांच्या भितीने त्यांनी शरद पवार यांची भेट न घेताच या ठिकाणावरून काढता पाय घेतला.

वाय. बी. चव्हाण सेंटर इथे आज शरद पवार हजर आहेत. यावेळी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजित सिंग मोहिते पाटील हे त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात माध्यम प्रतिनिधी असल्याने त्यांनी शरद पवार यांची भेट न घेताच इथून काढता पाय घेतला. रणजित सिंग हे माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. याच अनुषंगाने ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. मात्र भेट न घेताच रणजित सिंग मोहिते पाटील माघारी फिरले आहेत. यापूर्वी देखील माढा विधानसभेतून अनेक इच्छुकांनी तुतारी हातात घेतली आहे. त्यातच आता रणजित सिंग मोहिते पाटील हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी आल्याने ते पण विधानसभेच्या रिंगणात तुतारी हाती घेणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: श्रीवर्धनचा गड आदिती तटकरे राखणार? VIDEO

Sambhajinagar News : संभाजीनगरात एमआयएम व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Maharashtra Exit Poll : विक्रोळी मतदारसंघात सुनील राऊत होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

SCROLL FOR NEXT