Police deployment outside Akola City Kotwali police station after tension erupted over suspected beef sale in Baidpura area. Saam Tv
Video

गोमांस विक्रीच्या संशयावरून मोठा तणाव; अकोल्यात दोन गट आमनेसामने, VIDEO

Stone Pelting During Beef Raid: अकोल्यातील बैदपुरा भागात गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने आले असून पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहिती आहे.

Omkar Sonawane

अकोल्यातील बैदपुरा भागात गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर टाकलेल्या धाडीवरून दोन गट आमने-सामने आले आहे. बैदपुरा भागात एका दुकानातून गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांना मिळाली होती. बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांवर दगडफेक आणि मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र मारहाण झाल्याचा दावा पोलिसांनी नाकारला असून अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर दोन्ही गट आमने-सामने आले आहे.

दोन्ही गटांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु होती. खबरदारीचा उपाय म्हणून सिटी कोतवाली पोलीस स्टेशनसमोर पोलीस बंदोबस्त मोठा वाढवण्यात आला आहे. पोलीस स्टेशनसमोर भाजप, विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्याची मोठी गर्दी जमा झाली होती. पोलीस स्टेशनमध्ये काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाणही दाखल झाले आहे. थोड्याच वेळात भाजप आमदार रणधीर सावरकर पोलीस स्टेशनमध्ये पोहचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Traffic Alert: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर दीड तासापासून वाहतूक कोंडी|Video Viral

Maharashtra Live News Update: गेवराई शहरातील महाविद्यालयीन तरूणी अपहरण प्रकरणात पोलिसांना यश

ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, प्रमुख नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Kranti Redkar: '... आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली'; क्रांती रेडकरने सांगितली छबिल-गोदोच्या जन्माची खास आठवण

Mirchi Bhaji Recipe: हॉटेलसारखी खुसखुशीत मिरची भजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT