Supporters gather outside BJP office in Nashik amid ticket distribution controversy involving party leaders. Saam Tv
Video

तीन टर्म आमदाराच्या समर्थकाला नाकारलं, आयारामांच्या घरातील तिघांना उमेदवारी; भाजपचा अनोखा कारभार|VIDEO

Seema Hire Supporter Denied BJP Ticket: नाशिकमध्ये भाजपच्या तिकीट वाटपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. विद्यमान आमदारांच्या समर्थकांना डावलून पक्षांतरित नेत्याच्या एकाच कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजपमध्ये असंतोष उफाळून आला आहे.

Omkar Sonawane

ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये मोठी राजकीय बाजी मारली आहे. विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या समर्थकांना डावलून बडगुजर यांच्या एकाच घरात तीन उमेदवाऱ्या देण्यात आल्या आहेत. सुधाकर बडगुजर, मुलगा दीपक आणि पत्नी हर्षा बडगुजर यांना भाजपने संधी दिली. हर्षा बडगुजर यांचा अर्ज अगोदर दाखल झाल्याने आमदार समर्थकांचा एबी फॉर्म तांत्रिकदृष्ट्या व्यर्थ ठरला, यामुळे हिरे समर्थक आक्रमक झाले आहेत.

हर्षा बडगुजर यांच्या जागेवर आमदार सीमा हिरे यांच्या समर्थक भाग्यश्री ढोमसे यांना देखील एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र हर्षा बडगुजर यांचा अर्ज आधी आल्याने तो ग्राह्य धरला गेला. यामुळे ढोमसे यांचा अर्ज बाद केला गेला. यानंतर आमदार हिरे या शहरातील भाजप कार्यलयात दाखल झाल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात समर्थक देखील असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rule Change: LPG गॅस सिलिंडरचे दर वाढणार की कमी होणार? १ जानेवारीपासून जाहीर होणार नव्या किमती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं नववर्षाचं गिफ्ट; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात

Maharashtra Police: महापालिका निवडणुकांआधी पोलीस खात्यात मोठा फेरबदल, सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक

मंत्री गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाला धक्का, उमेदवारी अर्ज बाद, नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope: प्रेमात मिळेल यश, वैवाहिक जीवनात येणार आनंदी आनंद; जाणून घ्या कसा असेल नव्या वर्षाचा पहिला दिवस

SCROLL FOR NEXT