bjp News Saam tv
Video

ऐन निवडणुकीत भाजपकडून मोठी कारवाई, ४ पदाधिकार्‍यांची पक्षातून हकालपट्टी

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे भाजपने पक्षविरोधी भूमिका घेतल्याच्या आरोपावरून चार पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.

Namdeo Kumbhar

अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमध्ये भाजपनं मोठी कारवाई केली. पक्ष विरोधी भूमिका घेतल्यानं चार पदाधिकाऱ्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले. नगरपालिका निवडणुकीत उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवलाय.उमेदवारांच्या तक्रारीनंतर जिल्हाध्यक्षांनी ही कारवाई केली.

अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आली.. मूर्तिजापूर येथील चार पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी भूमिका घेतल्याने भाजपने पक्षातून हकालपट्टी केलीये. सहा वर्षांसाठी निलंबित त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. उमेदवारांच्या तक्रारीनंतर भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी ही कारवाई केली. मूर्तिजापूर येथील भाजपचे मंडळ कार्यकारिणी उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमोल पिंपळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे मंडळ अध्यक्ष श्रीकांत रामेकर, नमामी गंगे अभियान प्रमुख नितीन भटकर असे कारवाई करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे नाव आहे.. दरम्यान, मूर्तिजापूर नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विचारांशी गद्दारी करण्यासह उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी झाली आहे... जिल्ह्यात या अगोदर देखील अकोट तालुक्यात काही पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

HIV Injection Attack : लगीन मोडल्यामुळे संतापला, तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही इंजेक्शन; वाचा सविस्तर

Trending Hairstyles: अस्सल मराठमोळा थाट! पैठणी साडीवर ट्राय करा 'या' 5 ट्रेडिंग हेअरस्टाईल्स

Shocking News: लग्नामध्ये रसगुल्ला खाताना घशात अडकला, पाहुण्याचा तडफडून मृत्यू

Viral Video: केस ओढले, लाथा बुक्क्यांनी मारहाण अन्....; विद्यापीठात विद्यार्थिनींचा राडा

SCROLL FOR NEXT