Devendra Fadnavis Saam Tv
Video

Nagpur Politics: नागपूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई, ३२ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Nagpur Corporation Election 2026: नागपूर महानगर पालिका निवडणुकीदरम्यान भाजपने मोठी कारवाई केली. भाजपकडून ३२ पदाधिकाऱ्यांचे तडकाफकी निलंबन करण्यात आले. पक्षशिस्तभंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Priya More

नागपूर महापालिका निवडणुकीत पक्षशिस्तभंग केल्याप्रकरणी भाजपने मोठी कारवाई केली आहे. भाजपने अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढवणाऱ्या ३२ जणांचे निलंबन केले. भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचाकडून पदाधिकाऱ्यांना ६ वर्षांसाठी निलंबनाचा निर्णय घेतला. निलंबितांमध्ये माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांचा समावेश आहे. माजी नगरसेवक दीपक चौधरी यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आले. पक्षनिष्ठा आणि शिस्त सर्वोच्च, असा इशारा भाजप शहराध्यक्षांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

पक्षाच्या उमेदवारांविरोधात काम करणाऱ्यांवर भाजपकडून कारवाईचा बडगा सुरू झाला आहे. विविध प्रभागांतील कार्यकर्ते आणि उमेदवारांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. प्रभाग १ ते ३४ मधील एकूण ३२ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. महापालिका निवडणुकीत बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही असे स्पष्टपणे पक्षाकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

Snehalata Vasaikar: गिरिजा ओकनंतर ही अभिनेत्री होतेय व्हायरल, सौंदर्याने केलं मार्केट जाम

Plane Crash : ओडिशात भयंकर विमान दुर्घटना, ९ जणांना घेऊन जाणारे प्लेन क्रॅश

SCROLL FOR NEXT