BJP district chief Prabhakar Sawant announces suspension of six councilors in Kudal Municipality for alleged proximity with Shinde Sena. Saam Tv
Video

Maharashtra Politics: महायुतीत धुसफूस; शिंदे गटाशी जवळीक भोवली! नगरअध्यक्षासह भाजपचे सहा नगरसेवक निलंबित|VIDEO

BJP suspends Sindhudurg councilors: सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायतीत भाजपचे सहा नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या जवळीक साधल्याने भाजपकडून निलंबित करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

कुडाळ नगरपंचायतमधील भाजपच्या आठपैकी ६ नगरसेवकांना शिस्तभंग केल्याने भाजपमधून निलंबित करण्यात आल्याच्या नोटिसा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी बजावल्या आहेत. यामध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नयना मांजरेकर, अभिषेक गावडे, विलास कुडाळकर, राजीव कुडाळकर आणि चांदणी कांबळी या भाजपच्या नगरसेवकांचा समावेश आहे.

याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन हे सहा नगरसेवक भाजपमधून निवडून आले होते. ते पक्षविरोधी कारवाई करीत असल्याने त्यांच्यावर पक्षातर्फे निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे असे पत्राद्वारे कळवून त्यांच्याबाबत योग्य आदेश निर्गमित करावा असे पत्रात नमूद केले आहे. या निलंबनाच्या कारवाईमुळे सिंधुदुर्गातील महायुतीत खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रार केली होती. आणि आता शिंदेच्या शिवसेनेच्या जवळीक साधलेल्या सहा नगरसेवकांना निलंबित केले आहे. त्यामुळे महायुतीत पुन्हा धुसफूस सुरू झाल्याचे चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT