Ravindra Chavan ON Ajit Pawar saam tv
Video

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत घ्यायला नको होतं; भाजप प्रदेशाध्यक्षांच्या विधानानं खळबळ

Ajit Pawar Vs Ravindra Chavan : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे यावेळी थेट महायुतीतील भाजप आणि अजित पवार गटात शाब्दिक युद्ध सुरू झालंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत घ्यायला नको होतं, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलं.

Nandkumar Joshi

महापालिका निवडणुकांचं रण तापू लागलंय. त्याची सुरुवातच महायुतीपासून सुरू झाली आहे. महायुतीतील दोन प्रमुख पक्ष भिडल्याचे दिसून येतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हेच आमनेसामने आले आहेत. महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला घ्यायला नको होते, असं विधान चव्हाण यांनी करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर केले, त्यांच्या प्रत्येकासोबत आम्ही सत्तेत आहोत, असं अजित पवार म्हणाले होते. आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेवर कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे, असा आरोपही पवार यांनी केला होता. त्याच्यावरून भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. महापालिका निवडणुकीतील पराभव पाहून अजित पवार यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. म्हणून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचे बिनबुडाचे आरोप करतात, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले.

अजित पवार हे एजन्सीने लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचतात. त्यांना स्क्रिप्ट लिहून देणारी एजन्सी ही नवी आहे; म्हणून ते असे आरोप करतात असा दावा देखील रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यायला नको हवं होतं. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही खासगीत सांगायचो की विचार करा, अशी भावनाही रवींद्र चव्हाण यांनी बोलून दाखवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT