BJP leader Nandkishor Mundada seen assaulting a youth in a viral video, sparking outrage in Beed ahead of the municipal elections. Saam Tv
Video

Namita Mundada Father-in-Law: सत्तेची मस्ती! भाजप आमदाराच्या सासऱ्यांकडून तरुणाला विवस्र करून मारहाण; पाहा VIDEO

Beed Election Controversy Involving Namita Mundada: बीडच्या केजमधील भाजप नेते नंदकिशोर मुंदडा एका तरुणाला नग्न करून मारहाण करतानाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Omkar Sonawane

बीडच्या केजमधील भाजपाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांचा एका तरुणाला मारहाण करतानाचा आणि गळा दाबताना शिवीगाळ करणारा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हा व्हिडिओ समोर येत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आंबेजोगाई नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी नंदकिशोर मुंदडा हे उमेदवार आहेत. केज मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे ते सासरे असून, व्हायरल व्हिडिओमध्ये ते एका तरुणाला नग्न करून त्याचा गळा दाबत अश्लील शिवीगाळ करत असल्याचा प्रकार दिसत आहे.

लोकप्रतिनिधींच्या घरच्यांकडून असा प्रकार घडत असल्याने बीडमध्ये नेमकं काय चाललं आहे? कायद्याचा धाक उरलाय का? असा प्रश्न जनतेकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, त्यामागचं कारण काय आहे, आणि या प्रकरणी संबंधित तरुणाने कोणती तक्रार दाखल केली आहे का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पोलिसांची पुढील कारवाई काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT