chandrashekhar Bawankule on BJP Meeting in Delhi saam tv
Video

Maharashtra Politics : महाराष्ट्रात निवडणुका, दिल्लीत हालचाली; भाजप बैठकीत काय चर्चा झाली?

BJP Maharashtra Core Committee Meeting in Delhi : भाजपच्या महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक दिल्लीत झाली. त्यात संभाव्य उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Saam TV News

भाजप महाराष्ट्र सूकाणू समितीच्या (कोअर कमिटी) बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. महायुती २८८ जागांवर लढणार आहे. बहुमतानं महायुतीचं सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमच्या पक्षाकडील सध्याच्या जागांवर चर्चा झाली. अमित शाह यांच्यासह सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. संभाव्य नावांवर चर्चा करण्यात आली, असंही ते म्हणाले.

प्रचंड ताकदीने महायुती लढणार आहे. आमचा समन्वय चांगला झाला आहे. आम्ही २८८ मतदारसंघांत समन्वय समित्या स्थापन केल्या आहेत. सीईसी झाल्यानंतर पहिली यादी येईल. कोणाला तिकीट द्यायचे आणि नाही हा अधिकार सीईसीचा आहे, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: पर्थमध्ये पुन्हा टॉस बनणार बॉस? पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय निश्चित? पाहा रेकॉर्ड

Maharashtra Exit Poll: कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये राजेश लाटकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Indapur Exit Poll : इंदापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना मोठा झटका

Maharashtra Exit Poll: नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT