Eknath Shinde Saam Tv
Video

Mayor Election : एकनाथ शिंदेंवर भाजप नेतृत्व नाराज, 'हॉटेल पॉलिटिक्स'वरून राजकारण तापले, दिल्लीकडे तक्रार

BMC election results 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेच्या कमी स्ट्राईक रेटमुळे भाजप नेतृत्व नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरूनही भाजपने केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केल्याचे कळते.

Ganesh Kavade, Namdeo Kumbhar

Mumbai mayor election updates : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिंदेसेनेच्या निराशाजनक कामगिरीमुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपचा स्ट्राईक रेट सरस आहे. शिंदेसेनेनं 90 पैकी केवळ 29 जागा जिंकल्या. त्यामुळे युतीला काठावरचं बहुमत मिळालं. भाजपनं अधिक जागा लढवल्या असत्या तर आकडा 100च्या पार गेला असता, असा दावा राज्यातल्या नेत्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवाय, शिंदेंच्या 'हॉटेल पॉलिटिक्स'वरही भाजपनं आक्षेप घेत केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केल्याचं समजतंय.

एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढवल्याने महायुतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम झाला. मुंबईत एकनाथ शिंदे यांची कामगिरी निराशाजनक असल्याचे भाजप नेतृत्वाकडून मत मांडण्यात आले. भाजपने अधिक जागा लढवल्या असत्या तर 100 हून अधिक जागा जिंकल्या असत्या, असा दावा कऱण्यात आलाय. भाजपच्या राज्यातील नेत्यांनी ही भूमिका केंद्रीय नेतृत्वाकडे मांडल्याचे समोर आलेय.

एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्स ’वरही नाराजी व्यक्त करण्यात आली. भाजप135 जागा लढवून 89 जागा जिंकल्या. तर शिंदे गट 90 जागा लढवून केवळ 29 जागा जिंकल्या. परिणामी युतीला काठावरचं बहुमत मिळाल्याची चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात उद्या सायकल स्पर्धेनिमित्त काही रस्ते बंद

Mayor Election : राजकारण फिरणार! काँग्रेस फोडणार भाजपचे नगरसेवक?

Bigg Boss Marathi 6 : टोळीत फूट! रुचिताने थेट 'या' सदस्याला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून दाखवला बाहेरचा रस्ता, पाहा VIDEO

Bridal Jewellery Set: लग्नात नवरीसाठी ट्रेडिंगचे 5 ज्वेलरी सेट, कोणत्याही साडीवर उठून दिसतील

Red Blood Cells Deficiency: शरीरात लाल पेशींची कमतरता, मग आताच डाएटमध्ये या 4 पदार्थांचा समावेश करा, थकवा जाईल पळून अन् रहाल फिट

SCROLL FOR NEXT