Chitra Wagh SaamTv
Video

Chitra Wagh : चित्रा वाघ यांनी राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून घेतली शपथ

Governor appointed MLA : राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी नियुक्त आमदारांनी आज शपथ घेतली आहे. यात भाजपकडून चित्र वाघ यांनी शपथ घेतली आहे.

Saam Tv

राज्यपाल नियुक्त आमदारांचा आज शपथविधी विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली. त्यानंतर आज दुपारी या आमदारांचा शपथविधी पार पडला. भाजपकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यावेळी शपथ घेतली. भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून चित्रा वाघ यांच्याकडे पहिलं जातं. राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्या भाजपमध्ये महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्या पक्षाच काम सांभाळत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. त्यानुसार राज्यपालांनी या नावांना मंजूरी दिली होती. या आमदारांचा आज शपथविधी झाला. भाजपकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह विक्रांत पाटील आणि बाबू सिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "राजकारण करू नका..."; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सलमान खानचा फुल पाठिंबा, पाहा भाईजान नेमकं काय म्हणाला?

Maharashtra News Live Update: डेंगूच्या रुग्णांकडून जास्त शुल्क आकारू नका महापालिकेचे खाजगी रुग्णालयांना पत्र

Ladki Bahin Yojana : जूनचा हप्ता १५ जुलैला आला, मग जुलैचे १५०० कधी? ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठी अपडेट

8th Pay Commision : २.० फिटमेंट फॅक्टरमुळे तुमच्या पगारात होईल दुप्पट वाढ, कशी? जाणून घ्या सविस्तर

Rain Alert : कुठे रेड अलर्ट, तर कुठे ऑरेंज अलर्ट? पुढील ४८ तास राज्यात अति मुसळधार पावासाचा अंदाज, IMD कडून अलर्ट

SCROLL FOR NEXT