BJP leaders clash at CIDCO Municipal Office in Nashik amid nomination withdrawal chaos Saam Tv
Video

कसा निवडून येतो बघतेच मी, अर्ज माघारीच्या दिवशी भाजपचा राडा; नाशिकमध्ये उमेदवारांमध्ये मारामारी|VIDEO

Nashik BJP Candidate Clash: नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवारीवरून मोठा गोंधळ उडाला आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजप कार्यकर्त्यांनी उमेदवाराला घरात कोंडले, तर सिडको महापालिका कार्यालयात भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये थेट हाणामारी झाली.

Omkar Sonawane

राज्यात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून बंडना थंड करण्याचे आव्हान सर्वच पक्षांना आहे. विशेष म्हणजे भाजपचे सर्वाधिक बंडखोर उमेदवार असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये अर्ज माघारीवरून जोरदार राडा झाला आहे. तर भाजप उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरात कोंडले. घराला साखळी कुलूप लावून बंद करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप पक्षश्रेष्ठींवर केला. ज्ञानेश्वर काकड असे या उमेदवाराचे नाव आहे. शहरात सर्वच प्रभागात बंडखोरी केल्याचे पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे नाशिकच्या सिडको महापालिका कार्यात भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाठ आणि इच्छुक उमेदवार देवानंद बिरारी तसेच त्यांच्या पत्नी वंदना बिरारी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला आणि तो थेट हाणामारीपर्यंत पोहोचला.

प्रभाग क्रमांक 31 मधून वंदना बिरारी या इच्छुक उमेदवार होत्या. मात्र भाजपाने अधिकृत उमेदवारी बाळा शिरसाठ यांना दिल्याने बिरारी दाम्पत्य नाराज होते. आज वंदना बिरारी आणि त्यांचे पती देवानंद बिरारी हे माघार घेण्याच्या प्रक्रियेसाठी सिडको महापालिका कार्यालयात आले असताना वादाला तोंड फुटले.

शाब्दिक वादानंतर परिस्थिती बिघडली आणि दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: बर्फाळ वादळात विमानाचा भीषण अपघात; टेकऑफ करतानाच कोसळलं विमान, ७ जणांचा मृत्यू

विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतताना मुंबईच्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू

सरकार देणार गरिबांना 2 हजार? गरिबांसाठी केंद्र सरकारची नवी योजना?

लाडक्या बहिणींना शब्द, 1500 रुपयांचे 2100 रुपये करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळंच सांगितलं

मुंबईत शिंदेसेनेची स्वतंत्र गटनोंदणी? शिंदेंना भाजपसोबत संयुक्त गटनोंदणी का नको?

SCROLL FOR NEXT