Sanjay Kaka Patil SaamTv
Video

VIDEO : संजयकाका पाटलांनी घेतली अजितदादांची भेट; पाहा काय झाली चर्चा | Marathi News

SanjayKaka Patil Met Ajit Pawar : सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघासंदर्भात बोलणी करण्यासाठी अजित पवार यांची भेट घेतली आहे.

Saam Tv

सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील हे अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते अजित पवार यांच्या पक्ष कार्यालयात गेले आहेत.

संजयकाका पाटील यांच्या सुपुत्र प्रभाकर पाटील हे सांगलीच्या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहे. मात्र जागा वाटपाच्या तिढ्यात भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मैदानात असतील अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे त्याला अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळावी याबाबत ते अजितदादांशी चर्चा करणार आहेत. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना 'मी देवेंद्र भाऊंशी बोलून इकडे आलो आहे. अजितदादा यांना भेटलो ते म्हणले की, अजून चर्चा चालू आहे. जागा निश्चित झाल्या की ठरवता येईल.' असं संजयकाका पाटील यांनी म्हंटलं आहे. दरम्यान, विधानसभेला तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाकडून रोहित पाटील हे निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार,अशी लढत होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT