BJP supporters clash with police at Jat’s Shivaji Peth polling station during municipal elections. Saam Tv
Video

मतदान केंद्रातून भाजपच्या उमेदवाराला बाहेर काढले; पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा | VIDEO

Jat Election Violence At Polling Station: सांगलीच्या जत नगरपरिषदेच्या मतदान केंद्रावर भाजपच्या महिला उमेदवार प्रणिता यादव यांना बाहेर काढल्याने पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.

Omkar Sonawane

सांगलीच्या जत नगरपरिषदेच्या मतदाना दरम्यान गोंधळ झाल्याचा प्रकार घडला आहे. मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे. जत येथील शिवाजी पेठेत शाळा क्रमांक एक येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला आहे. भाजपच्या प्रभाग 5 मधील महिला उमेदवार प्रणिता यादव यांना मतदान केंद्रा बाहेर काढण्यावरून महिला पोलीस कर्मचारी आणि यादव यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर यादव समर्थकांनी मतदान केंद्रामध्ये घुसून पोलिसांसोबत हुज्जत घातली. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार राडा झाला. दरम्यान पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी घटनास्थळी धाव घेत भाजपच्या कार्यकर्त्यांची समजूत काढली. त्यामुळे या ठिकाणी काही काळ निर्माण झालेला तणाव निवळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT