शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगरांकडून मतदान करताना नियमांचे उल्लंघन, बूथवर 'त्या' महिलेला नेमकं काय सांगितलं?

Shinde Faction MLA Breaches Poll Code: शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. मतदान करताना त्यांनी नियमांचे उल्लंघन केले.
Shinde Faction MLA Breaches Poll Code
Shinde Faction MLA Breaches Poll CodeSaam
Published On

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील काही भागांमध्ये सकाळपासूनच जोमाने मतदान प्रक्रिया पार पडत आहे. हिंगोलीतील कळमनुरी येथेही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशातच कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदेसेनेच्या आमदारांनीच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केला आहे. याचा व्हिडिओही समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेला वेग आला. जनतेनं सकाळपासूनच मतदान करण्यासाठी आपआपल्या बूथवर रांगा लावण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, शिवसनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यांनी व्होटिंग बूथवर जाऊन मतदान केलं आहे.

Shinde Faction MLA Breaches Poll Code
मोठी बातमी! ३ की २१ डिसेंबर, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी कधी ? कोर्टात आज होणार फैसला

हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार परिसरात जाऊन शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हा मतदानाचा अधिकार बजावला आहे. मात्र, मतदान करताना संतोष बांगर यांनी नियमांचे उल्लंघन केलं आहे. त्यांनी व्होटिंग बूथवर गोपनीयतेचा भंग केला आहे. संतोष बांगर यांनी मतदान केल्यानंतर केंद्रात घोषणाबाजी केली आहे.

Shinde Faction MLA Breaches Poll Code
इन्फ्लूएन्सरचा '१९ मिनिटांचा' MMS व्हिडिओ लीक; तरूणीनं आणखी एक VIDEO केला शेअर, म्हणाली २ तरूणांनी..

बटन दाबताना महिलेला बांगर यांनी सूचना दिल्या. तसेच त्यांनी मतदान करताना घोषणाबाजीही केली. 'स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. एकनाथ शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है', असं म्हणत बांगर यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान बांगर यांनी गोपनीयतेचा भंग केल्यामुळे निवडणूक आयोग आता त्यांच्यावर काय कारवाई करणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरेल.

Shinde Faction MLA Breaches Poll Code
पुणे हादरलं! पुरूषाचं विवाहित स्त्रीसोबत अनैतिक संबंध; लग्नासाठी हट्ट करताच जिवंत जाळलं, शेवटी पुरावा मागे सुटला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com