Ashok Patil SaamTv
Video

Ashok Patil News : भांडुपचा सर्वांगीण विकास ही माझी पहिली जबाबदारी आहे, अशोक पाटीलांनी दिली प्रतिक्रिया

Bhandup Assembly Elections : भांडुप मतदारसंघात भाजपचे अशोक पाटील हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यानंतर त्यांनी साम टीव्हीला आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

Saam Tv

विधानसभा निवडणुकीनंतर भांडुप मतदारसंघात भाजपचे अशोक पाटील विजयी झाले आहे. याठिकाणी शिवसेना उबाठाचे रमेश कोरगावकर आणि शिंदेंच्या शिवसेनेचे अशोक पाटील यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. यावेळी अशोक पाटील यांनी साम टीव्हीशी संपर्क साधला. यावेळी बोलताना अशोक पाटील म्हणाले की, माझ्यासाठी ही लढाई अटीतटीची नव्हती, माझा या मतदारसंघातील जनतेशी जवळचा संबंध आहे. मी कायम सामान्य जनतेत फिरत असतो. त्यामुळे मला मतदारांचा कौल मिळेल याबद्दल खात्री होती. यापुढची पाच वर्ष आता मला भांडुपच्या सर्वांगीण विकासासाठी काम करायचं आहे. मुखत: भांडुपमधील रस्त्यांच्या दुरावस्थेने येथील नागरिक त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी भांडुपच्या रस्त्यांची दुरुस्ती हे माझं पहिलं काम आता असणार आहे, असं यावेळी बोलताना अशोक पाटील यांनी सांगितलं. त्यांचबरोबर इथल्या जनतेने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण करेन, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mega Block: रविवारी गरज असेल तरच बाहेर पडा! लोकल प्रवास होणार खडतर; मध्य- हार्बरवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे?

Maharashtra Live News Update: वर्सोवा गावातील दुकानाला मोठी आग

MS Dhoni : IPL 2026 मध्ये धोनी खेळणार की नाही? CSK च्या सीईओंनी दिली मोठी अपडेट

१८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप झाला 'तो' व्यवहारच रद्द; अजित पवारांनी दिली माहिती

Manoj Jarange: जरांगे हत्या कट प्रकरणात नवा ट्विस्ट; अटक आरोपीची पत्नी आणि आईचा गंभीर आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT