Dadar News SaamTv
Video

Dadar News : दादर हनुमान मंदिर प्रकरणी भाजप-ठाकरे सेना आमनेसामने, कार्यकर्ते भिडले | VIDEO

Clashes Between BJP - Thackarey Group : दादरच्या रेल्वेस्थानकातील हनुमान मंदिर प्रकरण चांगलंच तापलेलं बघायला मिळत आहे. यावरून आता मंदिर परिसरात भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहे.

Saam Tv

दादरच्या हनुमान मंदिराबाहेर राडा झाला आहे. भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने हा राडा झाला आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी प्रयत्न सध्या सुरू आहेत.

दादरमधल्या ५ मंदिरांना प्रशासनाकडून नोटिस पाठवण्यात आल्या आहेत. यात दादरच्या रेल्वे स्टेशन परिसरातील हनुमान मंदिराला देखील रेल्वे प्रशासनाने नोटिस पाठवली आहे. ८० वर्ष जुने हे मंदिर आहे. ते पाडण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले होते. त्यावर ठाकरे गटाने एल्गार पुकारला आहे. त्यानंतर आज या नोटीसीला स्थगिती देण्यात आली. मात्र याठिकाणी आज ठाकरे सेनेचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि इतर पदाधिकारी भेट देऊन महाआरती करणार आहेत. त्याच अनुषंगाने ठाकरे सेनेचे कार्यकर्ते हनुमान मंदिर परिसरात उपस्थित असताना मंगलप्रभात लोढा आणि रवी राणा यांनी याठिकाणी येऊन मंदिरात आरती केली. यावेळी भाजपचे कार्यकर्ते देखील याठिकाणी आले. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले बघायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Women Purse : महिलांनी प्रवास करताना पर्समध्ये 'या' ६ वस्तू कधीच ठेवू नयेत, जाणून घ्या कारण नाहीतर....

Mumbai Tourism : १८७५ पासून मुंबईची ओळख जपणारा 'हे' ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

CJP आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या निवासस्थानी 'इंडिया' आघाडीची बैठक; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये सायबर पोलिसांची मोठी कारवाई, १२ 'म्युल अकाउंट्स'विरोधात गुन्हा; बँक खाते भाड्याने द्यायचे अन्...

Maharashtra News Live Update: माळीण मार्गावरील वाहतूक ठप्प, पांचाळे गावाजवळ झाड कोसळले

SCROLL FOR NEXT