स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीवर अनोखे राजकीय समीकरणे घडताना दिसत आहे. तर इकडे भाजप आणि शिंदेगटाच्या गोटात नाराजीचा सुरू कायम आहे. एकीकडे भाजप आणि शिवसेनेचे बिनसलेले असताना कोल्हापुरात भाजपने मोठी खेळी केली आहे. देशामध्ये अनेक दशकांपासून एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या कॉंग्रेस आणि भाजपची कोल्हापूरमध्ये युती झाली आहे. कोल्हापुरातील शिरोळ आणि जयसिंगपूर नगरपालिकेत भाजप आणि कॉँग्रेस एकत्र आले आहेत. महादेव महाडीकांची ताराराणी आणि सतेज पाटलांचा कॉंग्रेस गट एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात शिरोळ तालुक्यात मोट बांधली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.