Gadchiroli News  AI Image
Video

Devendra Fadnavis : माओवादमुक्त गडचिरोली आता देशाचं आर्थिक इंजिन बनवणार, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis On Birsa Munda Jayanti : भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी समाजाच्या योगदानाचे कौतुक केले. गडचिरोली माओवादमुक्त झाल्याचा दावा करत भविष्यात देशाची स्टील सिटी बनणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Alisha Khedekar

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी समाजाच्या योगदानाचे कौतुक केले. आदिवासी समाजाने देशासाठी मोठा संघर्ष केला आहे. देशाच्या इतिहासात आदिवासी महापुरुषांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती आणि तंट्या मामा भील यांसारख्या आदिवासी महापुरुषांचा इतिहास देशासमोर आणला जात आहे. या महापुरुषांनी देशासाठी दिलेले योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला. जल, जमीन आणि जंगल यांवर आदिवासी समाजाचा अधिकार असावा, यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या या लढ्याला आणि बलिदानाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिवादन केले.

आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. पीएम जनमन आणि धरती आबा यांसारख्या योजनांमुळे दुर्गम आदिवासी भागांपर्यंत विकास पोहोचत आहे. या योजनांमुळे आदिवासी नागरिकांना चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होत असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबतही महत्त्वाचे विधान केले. गडचिरोली आता माओवादमुक्त झाल्याचा दावा त्यांनी केला. एकेकाळी मागास आणि नक्षलवादामुळे चर्चेत असलेला हा जिल्हा आता विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासाच्या संधी आहेत. भविष्यात हा जिल्हा देशाची स्टील सिटी म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. तसेच गडचिरोली हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा नसून विकासाच्या बाबतीत राज्याचा पहिला जिल्हा बनेल, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कंगवा किती दिवसांनी स्वच्छ करायचा? जाणून घ्या योग्य वेळ

मोदींची मोठी घोषणा! देशातून नक्षलवाद संपला; काँग्रेसला ही सुनावलं

Maharashtra News Live Update: HIV बाधित महिलेच्या मृतदेहाची मृत्यूनंतरही अवहेलना?

Lek Ladki Yojana: लेक लाडकी योजनेबाबत मोठी बातमी! आता घरबसल्या करता येणार अर्ज; सरकारने सुरू केली नवी सुविधा

Maharashtra Politics: ​2029 मध्ये तटकरे कुटुंबाला दणका? गोगावलेंच्या वक्तव्याने रायगडच्या राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT