Uddhav Thackeray Saam tv
Video

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंविरोधात कारवाई होणार?, कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी तिसऱ्यांदा नोटीस

Uddhav Thackeray: कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस आली आहे. चौकशी आयोगाने ही नोटीस बजावली असून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.

Priya More

कोरेगाव -भीमा दंगलप्रकरणातील चौकशी आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शरद पवारांनी दंगल ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा कट असल्याचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप करणारे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. तेच पत्र सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. आयोगाने उद्धव ठाकरे यांना २ डिसेंबर रोजी वैयक्तिकरित्या किंवा प्रतिनिधींमार्फत हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा जामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याचा इशाराही दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या अर्जानंतर आयोगाने ही नोटीस बजावली. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जुने आरोप-प्रत्यारोप उफाळून आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार

राज्यात थंडीची लाट, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पारा दहा अंशाच्या खाली|VIDEO

Mukta Barve : "शाळा सोडून किती वर्ष झाली..."; मुक्ताला कोणती स्वप्ने पडतात? काय दिसतं?

Mumbai : मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार

Kitchen Hacks : फ्रिजमध्ये भाज्या फ्रेश ठेवण्यासाठीच्या भन्नाट टिप्स

SCROLL FOR NEXT