Sunetra Pawar Saam tv
Video

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा? पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

Sunetra Pawar Resigns : सुनेत्रा पवार या आज संध्याकाळी ५ वाजता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्याआधी त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली.

Namdeo Kumbhar

Maharashtra cabinet reshuffle today : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधी घेणार आहेत. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार संध्याकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी अडीच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाच्या पुढील रणनीतीवर शिक्कामोर्तब होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांची आज गटनेता म्हणून निवड होणार आहे. दुपारी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीनंतर या सर्व चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षात अनेक नाट्यमय वळणे पाहायला मिळाली आहेत. त्यातच आता सुनेत्रा पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी 5 वाजता शपथ घेणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयाने राज्यातील राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षीय नेते आणि कार्यकर्ते शपथविधीच्या तयारीसाठी सज्ज असून, जनतेमध्येही उत्सुकता पहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT