Sharad Pawar News Update SaamTv
Video

VIDEO : अजित पवारांना विधानसभे पूर्वी बसणार मोठा धक्का ?

Assembly Election : अजित पवार यांच्या गटातील अनेक महत्वाचे नेते विधानसभे पूर्वी शरद पवार यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

Saam Tv

विधानसभे पूर्वी अजित पवार यांच्या गटातील अनेक महत्वाचे नेते शरद पवार यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेनंतर आता विधानसभेत देखील अजित पवार यांना शह देण्याची रणनिती शरद पवार यांनी आखलेली दिसत आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजितदादांना आणखीन काही धक्के बसू शकतात, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शरद पवार यांच्या गळाला लागलेले नेते नेमके कोणते हे बघणं येणाऱ्या काळात महत्वाचं ठरणार आहे. यात रामराजे नाईक निंबाळकर हे देखील लवकरच तुतारी हातात घेणार असल्याचं बोललं जात आहे. अतुल बेणके, हिरामण खोसकर हे देखील शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे देखील लवकरच तुतारी हाती घेणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर डॉ. राजेंद्र शिंगणे, संजयमामा शिंदे, नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ, अजित गव्हाणे असे अनेक बडे नेते अजित पवारांची साथ सोडणार असल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT