Uddhav Thackeray And Eknath Shinde Saam TV Marathi News
Video

Operation Tiger: उबाठाचे ६ बंडखोर खासदार मुंबईत दाखल, थोड्याच वेळात शिंदेसेनेत करणार प्रवेश; पाहा VIDEO

Big Blow to Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची साथ सोडलेले ६ खासदार मुंबईत दाखल झाले. ते आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत.

Priya More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरद्वारे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. शिंदेंनी ठाकरेंचे ६ विश्वासू खासदार फोडले. हे सर्व खासदार आज शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. हे सर्व खासदार नुकताच दिल्लीवरून मुंबईत दाखल झाले आहेत. शासकीय विमानातून हे सर्व खासदार मुंबई विमानतळावर आले.

भाऊसाहेब वाकचौरे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर हे ४ खासदार दिल्लीवरून मुंबईत आले आहेत. संजय दीना पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे या खासदारांसोबत नाहीत. ओमराजे निंबाळकर हे सोलापूरवरून निघाले आहेत पण ते अद्याप मुंबईत पोहचले नाहीत. तर संजय दीना पाटील हे मुंबईत असून ते थेट वायबी चव्हाण सेंटरवर येतील असे सांगितले जात आहे.

हे सर्वच्या सर्व ६ खासदार नंदनवन या एकनाथ शिंदे यांच्या शासकीय बंगाल्यावर जाऊन त्यांची भेट घेतील. त्यानंतर ते वायबी चव्हाण सेंटरवर जाऊन पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर त्याठिकाणीच ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करतील. उदय सामंत आणि इतर मंत्र्याच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कारची दुचाकीला धडक, तरुण गंभीर जखमी; शिरुरमधील घटना

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Rain Updates: जुलै अखेरपासून पुन्हा दमदार पावसाला सुरुवात; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार

Health Care Tips : महिनाभर रात्रीचे जेवण टाळले, तर शरीरात नेमके कोणते बदल होतात?

Monday Horoscope : आनंदात दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींनी महत्त्वाची कामे टाळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT