

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदारपुत्र कृष्णा नागेश पाटील (आष्टीकर) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली.
खासदार संजय राऊत यांची माहिती
या कारवाईबाबत अधिकृत माहिती देताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, "कृष्णा नागेश पाटील आष्टीकर हे गेल्या काही दिवसांपासून पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतले असल्याचे समोर आले होते. पक्षाची शिस्त मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, हा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे." पक्षप्रमुखांच्या थेट आदेशानंतर ही हकालपट्टी तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेतून ६ खासदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामध्ये नागेश आष्टीकर यांचाही समावेश आहे. कृष्णा आष्टीकर हे खासदार आष्टीकर यांचे पुत्र आहेत. त्यांच्या हकालपट्टीमुळे संबंधित मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षांतर्गत बंडाळी आणि शिस्तभंग रोखण्यासाठी ठाकरेंनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
६ खासदारांचा शिंदेसेनेत प्रवेश -
ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर यांच्यासह ६ खासदार आझ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश कऱणार आहेत. दुपारी ३ वाजता पक्ष प्रवेश होणार आहे. दुपारी ४ वाजता सर्व खासदार पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,बंदोबस्तात ६ खासदार मुंबईत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. विरोधात राहून कामं होत नाहीत, त्यामुळे आम्ही सत्तेत जात असल्याचे खासदारांनी सांगितलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.