Bhopal Robbery : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. भोपाळमधील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या 'एम्स' रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये एका महिलेला एकटे गाठून तिचे मंगळसूत्र लांबवण्यात आलंय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रुग्णवाहिका आणि कडक सुरक्षा असतानाही दिवसाढवळ्या घडलेल्या या लूटमारीच्या प्रकारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेय. लिफ्टमध्येही महिला सुरक्षित नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कर्मचारी लिफ्टने वर जात असताना एक मास्क लावलेला तरुण लिफ्टमध्ये शिरला. लिफ्टचे दरवाजे बंद होताच त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे महिला प्रचंड घाबरली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.