BMW with councillor logo seized by Bhiwandi police with ₹32 crore worth MD drugs Saam Tv
Video

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

BMW Councillor Logo In MD Drug Case: भिवंडीमध्ये पोलिसांनी ३२ कोटींच्या एमडी ड्रगसह बीएमडब्ल्यू व स्विफ्ट डिझायर कार जप्त केल्या. नगरसेवकाचा लोगो असलेल्या गाडीचा तपास सुरु असून यामध्ये दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

भिवंडीत महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.

१५ किलो ९२४ ग्रॅम एमडी ड्रग जप्त; किंमत ३१ कोटी ८४ लाख ८० हजार रुपये.

आरोपींकडून स्विफ्ट डिझायर जप्त, बीएमडब्ल्यू कार तपासाखाली.

दोन्ही आरोपींवर यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद.

गुन्हे शाखा घटक दोन, भिवंडी पथकाने महामार्गावर सापळा रचून 31 कोटी 84 लाख 80 हजार रुपये किमतीचा 15 किलो 924 ग्रॅम MD अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी दोन सराईत आरोपींना वाहनांसह अटक करण्यात आली.

रांजणोली-भिवंडी बायपास परिसरात दोन इसम अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुप्तदारांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई केली. छाप्यामध्ये तनवीर अहमद कमर अहमद अन्सारी व महेश हिंदुराव देसाई यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी ठाणे-मुंबई परिसरात विक्रीसाठी अमली पदार्थ घेऊन आले होते. या प्रकरणात आणखी आरोपी सहभागी असल्याचा संशय असून, त्यांचा शोध सुरु आहे.

कारवाईत आरोपींची स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली असून, बीएमडब्ल्यू कारसंबंधी तपास सुरु आहे. तनवीर अन्सारीवर यापूर्वी मुंब्रा, डायघर व भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत, तर महेश देसाईवर कोल्हापूर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Municipal Corporation: २.५ लाख भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप! काय होणार बदल? VIDEO

Hema Malini: ड्रीम गर्ल ते बसंती...; हेमा मालिनीच्या 'या' भुरळ पाडणाऱ्या खास भूमिका

Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळे बैठकीला थेट दुचाकीवरून पोहचल्या

Truck Accident: भीषण अपघात; बोगद्याजवळ ट्रक उलटला,एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, GR बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान

SCROLL FOR NEXT