Bhim Army Protest In Solapur | सोलापूरमध्ये भीम आर्मीनं आंदोलन केलं असून, महापालिका आयुक्तांच्या कारवर गटाराचं पाणी फेकलं SAAM TV
Video

VIDEO : आयुक्तांच्या कारवर फेकलं गटाराचं पाणी, भीम आर्मी आक्रमक

Bhim Army Protest at Solapur : विविध समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या भेटीची वेळ न मिळाल्यानं भीम आर्मी आक्रमक झाली. कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या कारवर गटाराचे पाणी फेकून निषेध नोंदवला.

Saam Tv

सोलापुरात महापालिका आयुक्तांच्या कारवर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी गटाराचं पाणी फेकलं. सोलापुरातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर परिसरात ड्रेनेजचं पाणी शिरलं असून, सर्वत्र दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. तसंच सार्वजनिक नळांद्वारे अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळं आजारांनी डोकं वर काढलंय. याबाबत भीम आर्मीकडून महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना निवेदन देण्यात येणार होतं. पण आयुक्तांच्या भेटीसाठीची वेळ मिळाली नाही. त्यामुळं कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी आयुक्तांच्या कारवर गटाराचे पाणी फेकलं आणि निषेध नोंदवला.

याबाबत येत्या 15 ऑगस्टपर्यंत महापालिका प्रशासनाकडून सकारात्मक पाऊल उचलले नाही तर रमाबाई आंबेडकर परिसरातील महिलांना घेऊन महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा भीम आर्मीच्या वतीने देण्यात आला आहे. या प्रकरणात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंजनगाव सुर्जी येथे नगरपरिषद निवडणूकीच्या अनुषंगाने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपची जाहीर सभा

Men Perosnality: महिलांना कसे पुरुष आवडतात?

माणिकराव कोकाटेंचा निकाल लागला, हायकोर्टात काय घडलं |VIDEO

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT