Bhaskar Jadhav News SaamTv
Video

Shivsena UBT : ठाकरे गटाचे प्रतोद, गटनेते आणि सभागृह नेते ठरले; भास्कर जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी

Udhav Thackarey News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे गटाचे प्रतोद, गटनेते आणि सभागृह नेते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Saam Tv

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचा प्रतोद, गटनेते आणि सभागृह नेते निवडण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. भास्कर जाधव यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. तर सुनिल प्रभू यांची पुन्हा एकदा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्ष नेतेपदी आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली.

उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी नवनियुक्त 20 आमदारांनी मार्गदर्शन केलं. तसंच विधानसभेत जरी समोर फडणवीस असले, तरी तुम्ही 20 आहात. त्यांना पुरून उरा, असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला. याचवेळी नवनिर्वाचित 20 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र देखील लिहून घेण्यात आलं आहे. या बैठकीत पक्षाचा प्रतोद, गटनेते आणि सभागृह नेते यांची निवड करण्यात आली. भास्कर जाधव यांची नियुक्ती गटनेते पदी केल्यानंतर यावर भास्कर जाधव यांनी 'पक्षप्रमुखांनी दिलेला आदेश विनम्रपणे स्वीकारावा लागतो. अन्यथा आदित्य ठाकरे यांची विधानसभा गटनेते पदी निवड व्हावी', असं माझं मत होतं, अशी प्रतिक्रिया दिली.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महावितरणचा मोठा झटका! वीज बिल थकलं तर घरात लगेच अंधार; नव्या नियमाने उडाली खळबळ

Oral Health : तोंडातून वास येतोय? मग हे 5 उपाय नक्की कराच

Cabinet Decisions : २५ मोठ्या योजनांचं काय होणार? वर्षभरात ठरणार; फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

SCROLL FOR NEXT