bhaskar jadhav leaving ubt party? saam tv
Video

Maharashtra Politics: ठाकरेंची साथ सोडणार का? भास्कर जाधव यांचे स्पष्टीकरण

Bhaskar Jadhav Explains: भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Saam Tv

कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत काहीच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. यावर भास्कर जाधव यांनी स्पष्टीकरण दिले . माझ्या क्षमतेनुसार मला पुरेशी काम करण्याची संधी पक्षात मिळाली नाही. हे केवळ माझ्याच वाटेला आले असं नाही. बऱ्याच जणांच्या वाटेला आले आहेत.

भास्कर जाधव पुढे म्हणाले, राजन साळवी यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यावर ते जाता आहेत. तर त्यांना जाउद्या अशी माझी भूमिका नाही. आपले सहकारी आपल्यासोबत राहिले पाहिजे. यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. ही माझी प्रामुख्याने भूमिका आहे. कोणत्याही सहकाऱ्याने पक्ष सोडू नये, हेच माझे मत आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जर कठोर भूमिका घेतली असेल, तर त्यामागे कारणे असतील. अनेकांना मोठमोठी पदे दिल्यानंतरही काही लोक पक्ष सोडत असतील आणि समजावून देखील ते थांबत नसतील, तर पक्षप्रमुखांची भूमिका योग्यच आहे. पण केवळ पक्षप्रमुख बोलतात म्हणून आम्हीही तेच बोलावे, असे मी मानत नाही. मी कालही हेच बोललो होतो, आणि आजही त्याच मतावर ठाम आहे.

सिंहगडावर उदयभान आणि नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांवमध्ये लढाई झाली. त्या लढाईत मालुसरे हे धारातीर्थ पडले, आणि मावळे सैरावैरा झाले आणि पाळायला लागले. त्यांनंतर सूर्याजी मालुसरे तेथे आले आणि ते म्हणाले 'अरे, पळता कुठे? फिरा मागे! मी तुमचे पळायचे दोरच कापले आहेत. लढा आणि मरा! असे गर्जताच मावळे जिंकले, असे ऐतिहासिक दाखले देऊन भास्कर जाधव यांनी आपला पक्ष बदलण्याच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

SCROLL FOR NEXT