Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी; शेलक्या शब्दांत बावनकुळेंची टीका | Video

BJP Vs ShivSena UBT : भाजप आणि शिवसेना उबाठा गटात वारपलटवाराचं सत्र सुरू झालं आहे. उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेवरून बावनकुळे आणि राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालेलं बघायला मिळत आहे.

उद्धव ठाकरेंना आमदार खासदार सोडून जातात मात्र त्यांना जाग येत नाही. त्यांचं नेतृत्व कोणालाही मान्य नाही, असं प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला दिलं आहे. तर यावरून खासदार संजय राऊत यांनी देखील पलटवार केला आहे. बावनकुळे यांना महसूलमंत्रिपद दिलं, हा गुन्हा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं बघायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी असल्याचंही थेटपणे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना म्हटलं आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना उबाठा गटात वारपलटवाराचं सत्र सुरू झालेलं दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका म्हणजे वेडेपणाचं लक्षण आहे. हा बिनडोकपणा आहे. आमच्या नेत्यांवर किंवा पक्षावर टीका करून काहीही साध्य होणार नाही आहे. आज आहे त्यापेक्षा वाईट परिस्थिती त्यांची होईल. यांच्याकडे अधिक जनमत वाढेल, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

तर हे बावनकुळे तेच ना ज्याने ६०० कोटीचा भूखंड एक रुपयाला घेतला आणि महाराष्ट्र लुटला? सहाशे कोटीचा भूखंड ज्यांनी एक रुपयाला घेतला महाराष्ट्र लुटण्याचा असा बालिशपणा आम्ही करणार नाही. ईडी सीबीआय कुठे आहे? या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी याला महसूलमंत्रिपद दिलं आहे हा मोठा गुन्हा आहे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालतात राज्य लुटणाऱ्यांना मंत्रिमंडळात घेतात. आम्हाला मिळेल का हा कसला बालिशपणा तुम्ही सांगत आहात, असा पलटवार खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com