Siddhi Hande
आतापर्यंत तुम्ही गरमागरम रगडा असलेली पाणीपुरी खाल्ली असेल. परंतु कधी थंड पाणीपुरी खाल्लीये का?
थंड पाणीपुरी खूप टेस्टी आणि मस्त लागते. ही पाणीपुरी बनवण्याची पद्धत सोपी आहे.
सर्वात आधी तुम्हाला पुदीना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं वाटून घ्यायचं आहे. त्यात जिरं पूड, काळे मीठ, लिंबाचा रस टाका. यामध्ये थंड पाणी टाका.
हे सर्व मिश्रण चाळणीतून गाळून घ्या. यामध्ये थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे टाकून बाजूला ठेवून द्या.
गोड पाणी बनवण्यासाठी चिंच आणि गूळ शिजवून घ्या. यानंतर थंड झाल्यावर ते गाळून घ्या.
यामध्ये लाल तिखट, जिरेपूड, काळं मिठ टाकून मिक्स करा.यामध्येही बर्फ टाकून ठेवा.
तुम्ही या पाणीपुरीत रगडा खाण्यापेक्षा मिक्स कडधान्य किंवा बुंदी टाकून खा.
पुरीमध्ये सर्वात आधी मिक्स कडधान्य टाका. त्यात गोड आणि तिखट पाणी टाकून खा.