Aditi Tatkare to lead the Independence Day flag hoisting ceremony in Raigad, sidelining Bharat Gogawale amid political row. Saam Tv
Video

भरत गोगावले यांचा पुन्हा पत्ता कट; १५ ऑगस्टला रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण|VIDEO

Raigad And Nashik Guardian Minister Row: रायगड पालकमंत्रीपदाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्टला रायगड येथील ध्वजारोहण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार असून भरत गोगावले यांना पुन्हा धक्का बसला आहे.

Omkar Sonawane

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्यापही सुटलेला नसताना यंदा देखील रायगडचे ध्वजारोहण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते होणार आहे. तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झेंडावंदन पार पडणार आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिन्याने राज्यातील जिल्हयाचे पालकमंत्री जाहीर झाले.

रायगडचे पालकमंत्रीपद हे अदिती तटकरे यांना दिले होते तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नेमणूक करण्यात आली होती. यानंतर अवघ्या काही तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा केलाय, तर दादा भुसे यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. यामुळे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव देखील आहे. या सगळ्यातच आज पुन्हा भरत गोगावले यांना पुन्हा झटका बसला असून 15 ऑगस्टला रायगड येथील झेंडावंदन हे अदिती तटकरे यांच्या हस्तेच होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा महायुतीमध्ये वाद होण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

Maharashtra Politics: शिंदेसेनेचे आमदार शिंदेंवर नाराज? राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय

Mumbai Kabutarkhana: कबुतरांविरोधात मराठी एकीकरण रस्त्यावर, कबुतरखान्याचा वाद आणखी तापणार

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का; बडा नेता फुटला, भाजपमध्ये प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: सांगलीचे सगळ्यात जास्त वाटोळ जयंत पाटील यांनी केले

SCROLL FOR NEXT