Bharat Gogawale caught on camera eating during Ajit Pawar's speech in Maharashtra Assembly – Screenshot from viral video Saam Tv
Video

Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी सभागृहात नेमकं काय खाल्लं? व्हिडिओ होतोय व्हायरल

Reactions on Bharat Gogawale Viral Video: राज्याच्या अधिवेशनात भरत गोगावले यांनी सभागृहात काहीतरी खाल्लं, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. अजित पवार भाषण करत असताना घडलेली ही कृती चर्चेचा विषय ठरली आहे.

Omkar Sonawane

रायगडचं पालकमंत्रिपद आणि घातलेली पूजा यामुळं चर्चेत असलेले मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले पुन्हा चर्चेत आले आहेत. सभागृहातील त्यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. अजित पवार सभागृहात बोलत असताना त्यांनी ती एक कृती केली आणि सोशल मीडियावर पुन्हा राडा सुरू झाला.

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात महत्वाच्या विषयांवर चर्चा सुरू आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार एका मुद्द्यावर चर्चेसाठी उभे राहिले होते. त्याचवेळी भरत गोगावले यांनी एक कृती केली. त्यांच्या शेजारील बाकावर बसलेल्या सदस्याकडून ते काहीतरी घेतलं आणि ते खाल्लं. गोगावले यांनी नेमकं काय केलं आणि काय खाल्लं हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी, नेटकऱ्यांकडून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या असून, काहींनी या गोष्टीची खिल्ली उडवली आहे. अधिवेशनात मंत्रिमहोदय अशा प्रकारे कॅमेऱ्यात कैद झाल्यानं अनेकांसाठी हा चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओवर अद्याप गोगावले किंवा शिंदे गटाची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या घडामोडीनं पुन्हा एकदा भरत गोगावले यांचं नाव चर्चेत आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT