Hotel Bhagyashree viral video : तुळजापूरजवळील प्रसिद्ध भाग्यश्री हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त फॉच्युनर एसयुव्ही भेट देत या हॉटेलने संपूर्ण राज्यात लोकप्रियता मिळवली होती. आता मात्र या हॉटेलच्या (Hotel Bhagyashree) बाहेर घडलेल्या हाणामारीमुळे हेच हॉटेल पुन्हा चर्चेचा विषय ठरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या बाहेर काही कारणावरून कामगार आणि काही तरुणांमध्ये तुफान वाद झाला.
या वादाचं रूपांतर थेट हातघाईत झालं. मारहाणीचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून, ‘नाद करतो काय यावचं लागतयं' असे संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.तुळजापूरजवळील भाग्यश्री हॉटेलमध्ये (Hotel Bhagyashree) नुकतीच झालेली तुफान हाणामारी आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हॉटेल मालकाने मोठा निर्णय घेतला आहे. आता हॉटेलमध्ये सुरक्षेसाठी थेट बाऊन्सर्स तैनात करण्यात आले आहेत. पुण्यातून तिघा बाऊन्सर्सना बोलावून त्यांची नेमणूक हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
हॉटेल (Hotel Bhagyashree) मालकाने म्हटलंय की, हॉटेलचं नाव मोठं झालं आहे. आपल्या मुलीच्या वाढदिवसाला फॉच्युनर एसयुव्ही गाडी भेट दिल्यानंतर आमचं हॉटेल राज्यभर चर्चेत आलं. पण हे काही लोकांना बघवत नाही. त्यामुळे आसपासच्या परिसरातील काही जण मुद्दाम येऊन गोंधळ घालतात, भांडण उकरून काढतात. हॉटेलची (Hotel Bhagyashree) बदनामी व्हावी यासाठी ग्राहकांची दिशाभूल केली जाते.
या सर्व प्रकारामुळे हॉटेलच्या व्यवस्थापनाने सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेतला असून, आता हॉटेलमध्ये कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी बाऊन्सर्स सतर्क राहणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.