Mahadev Munde SaamTv
Video

Walmik Karad : कराडचं टेंशन वाढणार! महादेव मुंडे हत्येचं सुशील कराड कनेक्शन? VIDEO

Parali Mahadev Munde Case : परळीचे व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येत वाल्मिक कराड आणि त्याचा मुलगा सुशील कराड यांचा हात असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Saam Tv

एकीकडे बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास अद्याप सुरूच असताना आता परळीमधले व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास आंबेजोगाई पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आम्हाला न्याय भेटावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. या प्रकरणात सुद्धा वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्ये बरोबरच महादेव मुंडे हत्या प्रकरणाने देखील कराडचं टेंशन वाढणार आहे.

मुंडे हत्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आणि तपासाला उशीर झाल्याचा आरोप होत असताना बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आता तपास हा पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत. मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी आ. सुरेश धस यांनी केली होती. मात्र आता या तपासाला गती आली असून मुंडे हत्या प्रकरणाचा पुन्हा एकदा संपूर्ण बाजूने तपास केला जाणार आहे. या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. तसंच जुनीयर कराड म्हणजेच वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याचा देखील यात हात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्याच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महादेव मुंडेंशी कराडचं काय कनेक्शन?

महादेव मुंडे हे परळीच्या कन्हेरवाडीचे दूध व्यावसायिक आहे. २०२२ मध्ये त्यांनी भोपळा गाव सोडून अंबाजोगाईत स्थलांतर केलं. वर्षभरातच महादेव मुंडेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. २२ ऑक्टोबर २०२३ ला वन विभाग कार्यालयाच्या आवारात त्यांचा मृतदेह आढळून आला. तीन महिन्यानंतरही या प्रकरणी कारवाई होत नसल्याने परळीच्या व्यापाऱ्यांनी परळी बंदची हाक दिली. तब्बल १५ महिन्यांपासून महादेव मुंडे यांच्या हत्येतील आरोपींचा तपास लागलेला नाही. मात्र वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने मुंडे कुटुंबाला तब्बल १५० फोन कॉल केल्याचा आरोप होत आहे. तर पोलिसांच्या सीडीआर तपासणीची मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नीने केली आहे. मुंडे यांच्या प्रकरणाचा तपास परळीच्या सानप नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सुरू केला होता. मात्र त्यांच्यावर राजकीय दबाव टाकून त्यांना बदलीसाठी भाग पडलं आणि आरोपींना वाचवलं असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे. यामुळे सुशील कराड याचे अनेक कारनामे उघड झाले आहे. मॅनेजरच्या घरात घुसून मुलीला मारहाण, रिव्हॉल्वरचा धाक दाखवून मॅनेजरची संपत्ती हडपली असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसंच सुशील कराडकडे अवैध बंदूक असल्याचंही उघड झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आज सुट्टी

Accident : पुण्याहून निघाले पण पहाटे काळाचा घाला, भयंकर अपघातात ४ जणांचा मृत्यू, २० जखमी

Famous Director Passes Away : प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ब्रेन स्ट्रोकशी झुंज अपयशी, मनोरंजनविश्वावर शोककळा

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! पीएम किसानचे ₹२००० कधी येणार; या दिवशी होऊ शकते घोषणा

Chutney Recipe : थंडीत जेवणाच्या पानात असायलाच हवी 'ही' चटणी, मजबूत हाडांसाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT