Beed News SaamTv
Video

Beed News : बीड एसपींची सिंघम कारवाई; अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा | VIDEO

Beed Illegal Activities : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता बीडमध्ये पोलीस अधीक्षक अॅक्शन मोडवर आलेले असून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केलेली आहे.

Saam Tv

बीडचे पोलीस अधीक्षक आता अॅक्शन मोडवर आलेले बघायला मिळत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर नवनीत कावत यांनी बीडच्या अधीक्षक पदाची सूत्र हाती घेतली आहे. त्यानंतर आता त्यांनी बीडमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणी प्रकरणातून झाली असल्याचा दावा गावकऱ्यांकडून आणि विरोधकांकडून केला जात आहे. यात खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याला देखील पोलिसांनी अटक केली असून सध्या तो मकोका अंतर्गत कोठडीत आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी नवनीत कावत यांनी बीडच्या अधीक्षक पदाचा कारभार स्वीकारला आहे. आता ते अॅक्शन मोडवर आलेले बघायला मिळत असून बीड जिल्ह्यातल्या सर्व अवैध धंद्यांवर कारवाई सुरू झाली आहे. यात दारू, गुटखा, जुगार, वाळू माफियांना त्यांनी दणका दिलेला आहे. तब्बल ६७१ गुन्हे अवैध धंद्यांविरोधात दाखल करण्यात आलेले आहेत. तसंच या माफियांकडून ३ कोटी २५ लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा जमा होणार अडकलेले पैसे? व्हायरल मेसेजचं सत्य आले समोर

Maharashtra News Live Update: मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात शिवाजी पार्कवर एल्गार; CJP चे पोलिसांना थेट पत्र

Nitin Gadkari : पेट्रोलचे टेन्शन विसरा! आता २५ रुपये लिटरमध्ये धावणार कार; गडकरींचा दावा पाहून बसेल धक्का

दुष्काळाच्या संकटात बळीराजासाठी देवस्थान धावून आलं; थेट १ कोटी ११ लाखांची मदत

Rice vs Chapati : भात की चपाती, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT