Banana fields in Nanded showing rotting crops due to excess rainfall and falling market prices. Saam Tv
Video

Banana Farmers In Crisis: केळी उत्पादक संकटात; हजारो टन केळी शेतातच सडली|VIDEO

Nanded Banana Farmers Facing Financial Crisis: नांदेडमध्ये पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि बाजारभाव कोसळल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Omkar Sonawane

जून महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सुमारे 4 हजार हेक्टरवर उभ्या असलेल्या केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र ऑटोमॅटिक वेदर स्टेशन चुकीच्या ठिकाणी बसवण्यात आल्यामुळे अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही पिकविमा मिळालेला नाही.

पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे केळीचे बाजारभाव कोसळले असून सध्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. उत्पादन खर्च वाढला. झाडांवर केळी पिकत असून सडून जात आहे.माल बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटल दर असलेल्या केळीला सध्या फक्त 300 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय.

बाजारात केळीची मागणी घटल्याने व्यापाऱ्यांनी केळी खरेदीकडून पाठ फिरवली आहे. त्यामुळे मोठा खर्च करून लागवड केलेले हे पीक शेतातच पिकून वाया जात असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. या केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भरधाव कारने चार ते पाच मोटारसायकल ना दिली धडक

Medu Vada Recipe : संडे स्पेशल नाश्ता; पीठ न आंबवता सकाळी १० मिनिटांत बनवा कुरकुरीत मेदू वडा

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; बीडमधील बडा नेता भाजपच्या वाटेवर, राजकीय समीकरण बदलणार

Coconut Chutney Recipe: वरण भात खाऊन कंटाळलात? मग ही खोबऱ्याची चटपटीत चटणी करून पाहाच

White Hair Care: पांढरे केस नॅचरली होतील काळे, हा घरगुती सामग्रीपासून तयार केलेला हेयरडाई महिन्यातून २ वेळा लावा केसांना

SCROLL FOR NEXT