Bagad Yatra Saam Tv
Video

Bagad Yatra: बावधनमध्ये बगाड यात्रेला सुरूवात, भाविकांची मोठी गर्दी; यावर्षी बगाड्या म्हणून कोणाला मिळाला मान?

Bagad Yatra Video: साताऱ्याच्या बावधन गावामध्ये बगाड यात्रेला सुरूवात झाली. यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत. भैरवनाथाचा विवाह सोहळा, छबिना, बगाड मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

Priya More

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री काळभैरवनाथाच्या यात्रेतील परंपरागत आणि वैशिष्ट्यपूर्ण बगाडाची मिरवणूक आज निघाली. यावर्षी बगाड्या होण्याचा मान बावधन येथील अजित बळवंत ननावरे (वय ३९ वर्षे) यांना मिळाला आहे. वाईजवळच्या बावधन येथे दरवर्षी फाल्गुन महिन्यात ३ दिवस ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाची यात्रा भरते.

काळभैरवनाथाच्या यात्रेत भैरवनाथाचा विवाह सोहळा, छबिना, बगाड मिरवणूक असे कार्यक्रम होतात. यावर्षी देवाला केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी बगाड घेण्याची प्रथा आहे. होळी पौर्णिमेच्या दिवशीच्या रात्री १२ वाजल्यानंतर बगाड्या ठरविण्यासाठी मंदिरातील पुजारी देवास पारंपरिक पद्धतीने कौल लावत असतात. यावर्षी एकूण ४४ नवसकरी नवस फेडण्यासाठी बसले होते. यामधील १० व्या क्रमांकावर असलेल्या अजित बळवंत ननावरे यांच्या बाजूने देवाने प्रसाद दिला असून त्यांना यंदाचा बगड्या होण्याचा मान मिळाला आहे.

अजित बळवंत ननावरे यांनी त्यांचे बंधू सुनील बळवंत ननावरे यांच्या लग्न जुळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर होऊन त्यांचे लग्न लवकर व्हावे, यासाठी २०१४ मध्ये नाथांच्या चरणी नवस केला होता आणि तो पूर्ण झाला. अजित ननावरे हे पहिल्यांदाच नाथांचा प्रसाद घेण्यासाठी बसले होते आणि याचवर्षी बगाड्या होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यानंतर काशिनाथाचं चांगभल, असा गजर करत बगाड्याच्या नावाची घोषणा केली.

बगाड म्हणजे काय?

बगाड म्हणजे दगडी चाके असलेला गाडा असतो. त्यावर बांबूच्या सहाय्याने ३० फूट उंचीचे शीड उभारलेले असते. हे शीड गोलाकार फिरते. त्यावर झोपाळ्याच्या मदतीने बगाड्यास टांगले जाते. त्यानंतर बगाड रथ चार- पाच बैलजोडीच्या सहाय्याने ओढला जातो. अधून- मधून बैल जोड्या बदलण्यात येतात. बावधनमधील हे बगाड पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्यासंख्येने येतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT