Shiv Sena corporator Hemant Chature undergoing treatment after being assaulted in Badlapur amid rising political tension. Saam tv
Video

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

BJP Workers Beaten To Shiv Sena Corporator Hemant Chature: शिवसेना नगरसेवक हेमंत चतुरे यांना मारहाण झालीय. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप चतुरे यांच्या कुटुंबियांनी केलाय. यामुळे बदलापूरमध्ये राजकीय तणाव वाढला आहे.

Bharat Jadhav

बदलापुरातील शिवसेनेचे नगरसेवक हेमंत चतुरे यांना बेदम मारहाण झालीय. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप चतुरे यांच्या कुटुंबियांनी केलाय. हेमंत चतुरे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हेमंत चतुरे हे शिवसेनेचे कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक आहेत. नगरपालिका निवडणुकाच्या वेळी हेमंत चतुरे यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता.

हेमंत चतुरे हे भाजपमध्ये असताना आमदार किसन कतोरे यांचे निकटवर्तीय होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाला भाजपमध्ये सामील करून शिवसेनेचे वामन म्हात्रे यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनी भाजपचा सूड उगवला. त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक हेमंत चतुरे यांना भाजपमधून फोडलं आणि शिवसेनेत प्रवेश दिला. हाती आलेल्या माहितीनुसार आज गुरुवारी रात्री नगरसेवक हेमंत चतुरे यांच्यावर कोणीतरी हल्ला केला. यात त्यांच्या चेहऱ्याला मार लागलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

पुणे ग्रँड टूरमध्ये अप्पांची धडाकेबाज एन्ट्री; वय ७०, जोश मात्र तरुणाला ही लाजवेल असा

SCROLL FOR NEXT