badalapur News Saam
Video

Local Body Election : बदलापुरात प्रचारसभेत राडा, दोन राजकीय पक्षांमध्ये जोरदार मारहाण | VIDEO

Badlapur Election Clash: बदलापुरात भाजप आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान डीजेच्या आवाजावरून वाद झाला आणि त्यातून मारहाण झाली. या घटनेनंतर आंदोलन पेटल्याने शहरात तणाव वाढला आहे.

Namdeo Kumbhar

Why BJP and Bahujan Mukti Party workers clashed in Badlapur : बदलापुरात निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होऊन हाणामारी झाली. शहरातील आंबेडकर चौकात भाजपची सभा सुरू असताना, त्याचवेळी बहुजन मुक्ती पार्टीची रॅली जात होती. डीजेच्या आवाजावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. त्याचे रूपांतर बाचाबाची आणि नंतर मारहाणीत झाले. या घटनेनंतर, बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले. या प्रकारामुळे बदलापुरातील निवडणूक प्रचारात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन सतर्क झाले आहे. प्रचारावेळी हाणामारीच्या या घटनेनं बदलापुरात निवडणूक प्रचाराला गालबोट लागलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT