bacchu kadu on dhananjay munde resign Saam Tv
Video

Maharashtra Politics:"मुंडेंनी राजीनामा देऊन भागणार नाही", बच्चू कडूंचं विधान

Bachchu Kadu criticizes: धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर संपूर्ण राजकीय स्तरातून त्यावर प्रतिक्रिया येत आहे. यावरच आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Omkar Sonawane

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्री बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने काहीच बदलणार नाही तर अशा प्रवृत्तीला खतपाणी घालणारे कोण आहेत, हा खरा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आज सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्याची वृत्ती वाढत आहे. हातात तलवारी घ्या, बलात्कार करा, हत्या करा फक्त सत्ता आमच्या हाती द्या असा विचार करणाऱ्यांचा निषेध केला पाहिजे.

बच्चू कडू पुढे म्हणाले, मारणारे कोणत्या जातीचे होते आणि मरणारा कोणत्या जातीचा होता हे महत्त्वाचे नाही. परंतु ज्या प्रवृत्तीने आणि ज्या क्रूर पद्धतीने एखाद्याचा जीव घेतला जातो, ते अत्यंत धक्कादायक आहे.

गेल्या दहा-वीस वर्षांत अशा प्रवृत्ती वाढीस लागल्या. गुन्हेगारी वृत्तीला राजकीय आश्रय मिळाल्यानेच महाठग आणि महाक्रूरदादा निर्माण होतात. या प्रवृत्ती रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत असे मत मांडले.

धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याचे कारण आजारपण सांगितले, हे लाजीरवाणे असल्याचे बच्चू कडू म्हणाले. राजीनामा देण्यामागे खरं कारण काही वेगळंच असावं. जर त्यांनी राजीनामा श्रद्धांजली म्हणून दिला असता, तर त्यात काहीतरी मोठेपणा दिसला असता. पण येथे कारण काही वेगळेच आहे, असे ते म्हणाले.

यावेळी बच्चू कडू यांनी राज्य सरकारवरही जोरदार हल्लाबोल चढवला,एका बाजूला प्रभू श्रीरामांचे नाव घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालायचे असे बच्चू कडू म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT