Mahayuti  saamtv
Video

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन अन् शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं; महायुतीच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Bachchu Kadu on Eknath Shinde chief minister : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही जिवाचे रान करू, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्तरावर मोठी भूमिका घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली.

Namdeo Kumbhar

Devendra Fadnavis national role statement : एकनाथ शिंदे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही जिवाचे रान करू असे वक्तव्य शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे प्रमोशन झाले पाहिजे. महाराष्ट्राचा आवाज देशभरात पोहोचला पाहिजे आणि ते सर्वोच्च पदावर गेले पाहिजेत, हीच आमची इच्छा आहे, असे कडू म्हणाले. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांना वाटत होते की आपण मुख्यमंत्री व्हावे आणि एकनाथ शिंदे यांनाही वाटत होते की आपण मुख्यमंत्री व्हावे, पण तेव्हा ते शक्य झाले नाही. मी सत्तेत असलो तरी आम्ही सामान्य माणसाचे कार्यकर्ते आहोत. आमच्या हातात शिवसेनेचा झेंडा असला तरी डोक्यातून शेतकरी कधीच जाणार नाही. आता हातात शिवसेनेचा झेंडा आणि डोक्यात नेहमी शेतकरी असेल, असेही कडू यांनी स्पष्ट केले.

यावेळी बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली. मात्र ₹2 लाखांपर्यंतच कर्जमाफी मर्यादित ठेवण्यात आल्याने अनेक शेतकरी वंचित राहतील. त्यांनी सर्व शेतकर्‍यांसाठी व्यापक कर्जमाफी, व्याजमाफी, OTS अटी शिथिल करणे आणि प्रोत्साहन निधी वाढवावी. अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वांगचुक रुग्णालयात, CJPच्या आंदोलनाचं काय? अभिजीत दिपके करणार अन्नत्याग आंदोलन

बिश्नोई गँगच्या रडारवर आमिर खान, तिसरं लग्न आणि धमकी...आमिर खान खरंच लव्ह जिहादी?

Ind vs Eng 3rd ODI : रोहित शर्माच्या रिटायरमेंटची चर्चा असतानाच भारतीय संघात मोठा बदल; कुणाला मिळाली संधी?

FDAची अय्यंगार बेकरीवर धाड; गलिच्छपणा अन् एक्सपायर माल पाहताच 'ऑन द स्पॉट' लायसन्स रद्द, टाळं ठोकलं

शिंदे घराण्याची 500 वर्ष जुनी 3000 किलोची तोफ चोरीला; दरोडेखोर घेऊन आले होते ट्रक अन् क्रेन

SCROLL FOR NEXT