Bachchu Kadu SaamTv
Video

Ladki Bahin Yojana : योजना लाडक्या बहिणींसाठी नाही, तर सत्तेत येण्यासाठी होती; बच्चू कडू यांचा सरकारवर हल्लाबोल | Video

Bachchu Kadu : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत असलेल्या निकषात न बसणाऱ्या महिलांची चाचपणी होणार असून अशा महिलांना योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. त्याबद्दल बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Saam Tv

लाडकी बहीण योजना म्हणजे नेत्यांच्या खिशातून गेलेले पैसे नाही. सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन मत ओढण्याचा तो प्रयत्न होता, अशी टीका प्रहारचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी नव्हती, सत्तेत येण्यासाठी होती, असंही कडू यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, योजना सुरू केल्यावर कोण पात्र कोण अपात्र याची माहिती न घेता सर्व महिलांच्या खात्यात पैसे वाटले गेले. मात्र आता तुम्ही तपासणी करत आहे की कोणती बहीण योजनेसाठी पात्र आहे, ही चाचपणी योजना सुरू होण्याआधी करायला हवी होती. आत्ता ही तपासणी करून महिलांना पैसे द्यायचं बंद करणं म्हणजे लाडक्या बहिणींची फसवणूक आहे, असं म्हणत कडू यांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. योजनेला पात्र अपात्रतेचे निकष आधीच होते तर निवडणुकीपूर्वी सरकारने सरसकट पैसे कसे वाटले? आता सरकार स्थापन झाल्यावर महिलांना तुम्ही त्या अपात्र असल्याचं सांगून पैसे द्यायचं बंद करत आहात, ही फसवणूक आहे, सरकारने गुन्हा केला आहे, असंही आरोप यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

Benefits of Squats: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिटं स्क्वाट्स एक्सरसाइज नक्की करा

SCROLL FOR NEXT