Ramgiri maharah on Aurangazeb Tomb saam tv
Video

Aurangzeb Tomb Row : औरंगजेबाची कबर पूर्वीच हटवायला हवी होती: महंत रामगिरी महाराज

Aurangzeb Tomb Should Have Been Removed : औरंगजेब क्रूर प्रशासक होता. त्याची कबर असणे हेच दुर्दैवी आहे. याआधीच औरंगजेबाची कबर हटवायला हवी होती, असं महंत रामगिरी महाराज म्हणाले.

Nandkumar Joshi

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापलं आहे. औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी, अशी मागणी होत आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून तशी मागणी केली जात आहे. तसेच आंदोलनही केले जात आहे. आता याच आंदोलनाला महंत रामगिरी महाराज यांनी समर्थन दर्शवलं आहे. यापूर्वीच औरंगजेबाची कबर हटवायला हवी होती, असं वक्तव्य रामगिरी महाराजांनी केलं आहे.

औरंगजेबाची कबर हटवण्यासंदर्भात महंत रामगिरी महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाची कबर यापूर्वीच हटवायला हवी होती. कबर हटवण्याची मागणी होत आहे. त्यासाठी आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला आमचं समर्थन आहे, असंही महंत रामगिरी महाराज म्हणाले.

औरंगजेब हा क्रूर प्रशासक होता. त्याने मंदिरे पाडून मशिदी बांधल्या. त्यामुळं त्याची कबर हटवायला हवी, असं रामगिरी महाराज म्हणाले. औरंगजेब हा क्रूर होता. तो भारतीय वंशाचा नव्हता. त्याने एवढे अत्याचार केले, अशा व्यक्तीची कबर ठेवून काय करणार आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण देशात दहशत माजवली, कुंभमेळ्यावरही हल्ला केला होता. अनेक मंदिरे पाडली. संभाजी महाराजांचे धर्मपरिवर्तनासाठी हालहाल केले. अशा व्यक्तीची कबर असणे हे दुर्दैवं आहे. खरं तर हे यापूर्वीच व्हायला हवे होते. आता जे आंदोलन होत आहे. त्या आंदोलनाला आमचं समर्थन आहे, असंही रामगिरी महाराज म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

SCROLL FOR NEXT